नागपूर लोकसभा निवडणूकीत बसपच्या मतांमध्ये घट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपूर लोकसभा मतदा- रसंघात बहुजन समाज पक्षाच्या (बसप) मतांमध्ये सलग तिसºया निवडणुकीत (वर्ष २०२४) मोठी घट झाली आहे. यंदा बसपला केवळ १९ हजार २४२ मते मिळाली. त्यामुळे बसपच्या गटात चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरात बसप उमेदमवार किती मत घेणार, याकडे सगळ्याचेच लक्ष लागले होते. उत्तर प्रदेशात बºयाच वर्षांपूर्वी बसपची सत्ता होती. त्यानंतर नागपूरसह महाराष्ट्रात हा पक्ष मजबूत होऊ लागला. परिणामी, बसपच्या मतदानाचा टक्काही वाढला. नागपूर महापालिकेतही बसपचे नगरसेवक चांगल्या संख्येने निवडून आले. काही लोकसभा निवडणुकीत बसपच्या उमेदवारांनी चांगली मतेही मिळवली. मात्र, गेल्या तीन निवडणुकीत हे चित्र बदलले. नागपूर लोकसभा मतदारसंघात बसपच्या मतांमध्ये सतत घट होत आहे. २०२४ मध्येही बसपला केवळ १९ हजार २४२ मते मिळाली. नागपूर लोकसभेचा विचार केल्यास २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपच्या मतांमध्ये चांगली वाढ झाली. माणिकराव वैद्य यांनी बसपकडून १ लाख १८ हजार ७४१ मते मिळवली होती. मात्र, त्यानंतर मतांची संख्या घटत गेली. यंदाच्या निवडणुकीत मतांमध्ये मोठी घट झाल्याने बसपच्या गोटात चिंता वाढली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *