भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : प्रचंड ईच्छाशक्ती, जिद्द, चिकाटीच्या बळावर एखादी अशक्यप्राय गोष्टही साध्य करता येते. जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करणे गियार्रोहकांच्या पहिल्या पसंतीचे आहे. तितकेच तिथे जाणे जिकरीचे आहे. पुणे येथे सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीवर असलेल्या गोंदियातील २६ वर्षीय साहिल संजय टाह याने ६ दिवसांत एव्हरेस्ट शिखर सर करून राष्ट्रध्वज रोवला. त्याच्या या कामगिरीचा त्याच्यावर जिल्ह्यातून शुभेच्छा आणि कौतूकांचा वर्षाव होत आहे. गोंदियातील अनेक गियार्रोहक कैलास पर्वतावर गेले आहेत पण आजपर्यंत कुणीही एव्हरेस्ट शिखर गाठू शकले नाही, हा विक्रम साहिल टाहच्या नावावर नोंदवला गेला आहे. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची ५३६४ मीटर (१७५९८ फूट) आहे, या अथार्ने हा जगातील सर्वात उंच बेस कॅम्प आहे. या उंच पर्वतांवर ट्रॅकिंग करणे कठीण समजले जाते. परंतु साहिलने २६ मे रोजी बेस कॅम्पवर पोहोचून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. साहिलने बर्फाचे वादळ आणि थंड वाºयाचा सामना करत ६ दिवसांत बेस कॅम्पचा प्रवास सर केला.
माउंट एव्हरेस्टचे नाव ऐकताच अनेक अनुभवी ट्रेकर्सचे हातपाय फुगतात. अत्यंत खडतर प्रवासात बर्फाचे वादळ आणि ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहणारे थंड वारे यांचा सामना करावा लागतो, पण ध्येय गाठण्यासाठी साहिलने हार मानली नाही आणि प्रबळ ईच्छाशक्तिने एव्हरेस्ट सर केला. साहिलला ट्रॅकिंगची आवड आहे. एव्हरेस्टवर चढाई करण्याचे त्याचे ध्येय होते. तो पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. १८ मे २०२४ रोजी त्याचा मित्र केदार सुरेंद्र शिंदे (पुणे) सोबत नेपाळ, काठमांडू येथे लुक्ला विमानतळावर पोहोचला.१९ मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा प्रवास सुरू केला आणि साहिल आणि केदार एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या शिखरावर पोहोचले. एव्हरेस्ट ट्रॅक करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी साहिलने फिटनेसकडे विशेष लक्ष दिले. योग आणि व्यायामाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवले. प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या भरवशावर त्याने त्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले.