भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : किराणा साहित्य घेऊन जाणाºया व्यक्तीच्या सायकलला मागून भरधाव वेगाने येणाºया दुचाकीने धडक दिली. यात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 5 जून रोजी रात्री ८ वाजता तालुक्यातील पिपळगाव/कोहली येथील राज्य मार्गावरील वळणावर घडली. कैलास सुका रामटेके (५५) रा.पिंपळगाव/कोहळी असे मृतकाचे नाव आहे. तर दुचाकी चालक तुषार रुपचंद मसराम (३०) हा किरकोळ जखमी झाला आहे.