भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- भंडारा शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी, चांगले रस्ते अशा प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्यास नगर परिषद प्रशासन हे कुचकामी ठरत आहे. शहरातील अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रासाला समोर जावे लागत असल्याने शहरातील व शहराकडे येणारे रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी शिवसेना भंडारा शहर (उबाठा)तर्फे दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. भंडारा शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते जे. एम. पटेल कॉलेज रोड, तुरसकर कॉम्पलेक्स समोर, राजीव गांधी चौक, खांबतलाव चौक, शास्त्रीनगर चोक, टाकळी येथील पुलाजवळील, किसान चौक, शुक्रवारी वार्ड, या सारख्या अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे शहरातील तसेच बाहेरून शहराकडे येणाºया दुचाकीस्वारांना तसेच चारचाकी वाहनधारकांना याचा कमालीचा त्रास होत आहे, अशा खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वाराचे लहान मोठे अपघात होवून काहींना जिवाला मुकावे लागले तर काहींना अपंगत्व आले . रस्त्याचे कर टॅक्स भरूनही वाहनधारकांना चांगले रस्ते न मिळणे हे दुदैवी असून यासाठी संबंधीत विभागाचे अधिकारी पुर्णत: जबाबदार आहेत. रस्ते बांधकामात दर्जा जोपासल्या न जाणे हे यामागील एक प्रमुख कारण आहे.
परंतु टक्केवारी च्या लालसेने संबंधीत विभागाचे अधिकारी व शहरातील जनप्रतिनिधींना याचे काहीही घेणे देणे नाही.नागरीकांची, वाहन धारकांची ही अडचण लक्षात घेवून शिवसेना भंडारा शहर तर्फे २७ फेब्रुवारी २०२४ ला न.प. भंडारा, सा.बा.वि. भंडारा, हयांना निवेदने देण्यात आलेली होती परंतु संबंधीत विभागाने त्यावर कसलीही कार्यवाही न केल्यामुळे ११ मार्च २०२४ ला आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु पोलीस निरीक्षक श्री. सुर्यवंशी हयांनी आपल्या दालनात संबंधीत विभागाच्या अधिकाºयांना बोलावून चर्चा घडवून आणून ८ दिवसात खड्डे बुजविण्याचे तोंडी आश्वासन दिलेले होते परंतु कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे १२ जुन पर्यंत संबंधीत विभागाने शहरातील व शहराकडे येणाºया रस्त्यावरील खड्डे त्वरीत कायमस्वरूपी बुजवावेत अन्यथा शिवसेना पक्षातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे , अँड रवि वाढई, शहरप्रमुख आशीक चुटे,वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष मनीष सोनकुसरे, शहर संघटक शैलेश खरोले,नरेंद्र पहाडे , सुधीर उरकुडे , राकेश आग्रे ,ललित बोंद्रे,हर्षल टेंभुरकर, चित्रागंध सेलोकर, तिलक सार्वे, गंगाधर निंबार्ते,मयुर हलमारे ,अबरार मिर्झा ,बालकदास परतेती, गोपीचंद गोमासे , संदिप गभणे , सुशील हटवार, आशीष गणवीर, असीम सरोदे, राहुल सोनकुसरे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.