भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीच्या फक्त १८ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार संसदेत गेले आहेत. भाजपाचा हा पराभव स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आज दिल्लीत अमित शाहांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यास त्या जागी शंभूराज देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यावर शंभूराज देसाईंनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रातील भाजपाची पिछेहाट पाहता देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारी मुक्त करण्याची विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यास उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदी शंभूराज देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज दिवसभर यावर चर्चा सुरू होती. परंतु, या चर्चांवर आता शंभूराज देसाईंनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री पदाबाबतचे दावे फेटाळून लावले आहेत. ‘मला उपमुख्यमंत्री पद मिळणार आहे, यात कोणतंही तथ्य नाही.
ही बातमी निराधार आहे. कोअर कमिटीच्या मीटिंगमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अपयश स्वीकारला. सरकारमधून बाहेर पडून तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. परंतु, बावनकुळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत खुलासाही केला. देवेंद्रजी संघटनेचंही काम करतील आणि पदावरहीराहतील, असं आम्ही ठरवलं आहे. या मतावर सर्व ठाम आहोत. ते अमित शाहांना भेटले आहेत. त्यांच्यात काय चर्चा झाली माहिती नाही. आम्ही दिल्लीला जाणार आहोत, पक्षश्रेष्ठींना भेटून आमच्या भावना सांगणार आहोत. देवेंद्रजींना राजीनामा देण्याची गरज नाही. ते संघटनेतही राहू शकतात आणि सरकारमध्येही राहू शकतात’, असं म्हणत राजकीय चर्चांवर शंभूराज देसाई यांनी पूर्णविराम दिला आहे.