भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील वाहतुकीची होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भंडारा बायपास रस्त्याचे काम जलद गतीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव योगेश कुंभेजकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणेला दिले. यापुर्वी देखील ७ जून रोजी जिल्हाधिकाºयांनी स्वत: पोलिस अधीक्षकांसह बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करून या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. भंडारा शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी बायपास मार्ग आवश्यक आहे.
बायपास मागार्चे काम झाल्यास वाहतूक विना अडथळा सुरूराहण्यास मदत होणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर हे स्वत: या बायपास मार्गाची निर्मिती लवकरात लवकर व्हावी याकरिता वेळोवेळी आढावा घेत आहेत. यावेळी पुन्हा त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी त्यांच्यासोबत कारधा चौक व वैनगंगा नदीवरील बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन मोका पाहणी केली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बसेन व या प्रकल्पासाठीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता उपस्थित होते. जून महिन्यात अखेरपर्यंत कारधा चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपासच्या कामकाजाला गती द्यावी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.