नक्षल्यांच्या आणखी एका कॅम्पचा पदार्फाश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेवर सावरगावजवळ कुलभट्टी जंगलातील डोंगरावर नक्षल्यांचा तळ उध्दवस्थ केल्याच्या कारवाईला २४ तासही होत नाहीत तोच छत्तीसगड सीमेलगतच्या गॅरापत्ती पोलिस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आणखी एका नक्षली तळाचा जवानांनी पदार्फाश केला. ७ जून रोजी ही कारवाई केली. छत्तीसगड सीमेलगतच्या गॅरापत्तीजवळील कसनसूर चातगाव, टिपागड, दलम, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर व औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे गॅरापत्तीजवळील भिमनखोजी, नारकसा जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्रित आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणा होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कारवाईचे आदेश दिले. अपर अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक व पोस्टे गॅरापत्ती तसेच सीआरपीएफ ११३ बटालिन अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबवित होते.

भिमनखोजी जंगल परिसरात शोध मोहिम राबवित़ पुढे जात असतांना, अंदाजे तीन वाजताच्या दरम्यान माओवाद विरोधी अभियान पथकातील पहिल्या ग्रुपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसूनआला. सदर कॅम्पच्या दिशेने सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असताना पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडून पहाडी व घनदाट जंगलाचा फायदा घेत अगोदरच पळ काढला माओवाद्यांच्या कॅम्पच्या ठिकाणी जाऊन शोध अभियान राबविले असता १ सोलार प्लेट २, पँट, ३ चप्पल जोड, ३ ताडपत्री २ प्लास्टि बेल्ट, शाल, दुपट्टे, बेडशिट, लायटर, गंज, मेडिकल कीट, पाणी कॅन, कात्री असे विविध साहित्य आढळले. ते जप्त केले असून अधिक तपास सुरु आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *