भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : निवडणुकीचे कार्य सांगीक असते. उमेदवार जिंकल्यावर श्रेय घेण्याची कसर सोडली जात नाही. मात्र पराजय झाल्यावर दुसºयावर खापर फोडणे चुकीचे आहे. आपला दोष लपविला जाण्याची व ढकलण्याची खटपट केली जाते. या वृत्तीवर आमदार राजू माणिकराव कारमोरे यांनी पत्र परिषदेत परखड मत व्यक्त केले. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला पराजय बघावा लागला. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा जनक वातावरण पसरले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षा कामगिरी करता आली नाही. याचे चिंतन करण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत निरर्थक मुद्दे आले होते. मतदारांपुढे विरोधकांनी आपले मुद्दे व्यवस्थित मांडले. तसेच मतदारापर्यंत पोहोचवले यात विरोधक यशस्वी झाले. निवडणूक जिंकण्याची भाजपाची रणनीती व योजना उत्कृष्ट होती. आम्ही मात्र कार्यकर्ते यात कमी पडलो. काही ठिकाणी समन्वयाच्या अभाव दिसला. यावर आपण कोणाला दोषी धरणार नाही. आपलेही कुठे चुकले असेल. त्यामुळे आपले दोष लपवून, दोषांची कारणे शोधणे महत्त्वाचे वाटते. जिंकल्यानंतर जशी श्रेयासाठी आपण लढाई करतो. आपल्यामुळेच हे सगळे झाले आणि पराजयाचे वेळी आपण दुसºयावर वेगळी कारण दाखवून ढकलणे चुकीची आहे असे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.
पुढील काळात महायुतीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी समन्वयातून पुढे गेले पाहिजे. एकमेकांचे सहकार्य असले तरच विधानसभेचे गड सर करता येईल. तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघात कुठे व कसे आपण मागे पडलो, कसा फटका बसला याची बसून चर्चा व मंथन करणार आहोत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुन्हा आमच्यासमोर निश्चित राहील. पण यावर मात देण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट)यावर सगळी आव्हाने परतवून लावणार आहे असेही त्यांनी सांगितले. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात आपण विकास आकडे लक्ष दिले आहे. आपला विकासावर राजकारण सुरू आहे. पूर्वीच्या कार्यकाळ तपासून बघितला तर आम्ही अधिक प्रमाणात निधी आणून क्षेत्राच्या विकास केला आहे असे नक्कीच दिसून येईल. असे सांगून त्यांनी धान खरेदीवर भाष्य केले, ९०% गोदाम खाली आहेत.पण शासकीय आधारभूत केंद्रात धान्याची खरेदी केली जात नाही. त्याचे कारण म्हणजे खुल्या बाजारात चांगले दर शेतकºयांना मिळत आहेत. त्यामुळे हा फरक दिसून येत आहे.
मोहाडी येथे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवार दि. ८ जून २०२४ ला सायंकाळी ७.३० वाजता घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेला मोहाडी राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष सदाशिव शिवाजी ढेंगे, मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश भाऊराव वासनिक, सुभाष रामाजी गायधने, नगरपंचायतचे उपाध्यक्ष सचिन बालचंद गायधने, प्रमेश नलगोकुलवार, मनोहर हेडाऊ, सिराज शेख, खुशाल कोसरे, यशवंत बावणे, आकाश गायधने, आदर्श बडवाईक, सुनिल चवळे आदी प्रामुख्याने हजर होते.