रमाकांत खोब्रागडे तिरोडा : तिरोडा येथील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यालयातर्फे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयास आस्थापना शुल्क, सोयी सुविधा शुल्क व जाहिरात खर्चाची रक्कम देण्याचा विसर पडला असून मागील तीन वर्षापासून ही रक्कम या कार्यालयातर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमाच करण्यात आली नाही. शासनातर्फे धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे उजवा व डाव्या कालव्याचे कामाकरता भूसंपादन करण्यात आलेले जमिनीचा मोबदला उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय तिरोडा तर्फे संबंधित शेतकºयांना देण्यात आला असून याकरता महाराष्ट्र शासन निर्णया प्रमाणे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयास धापेवाडा उपसा सिंचन विभागातर्फे दोन टक्के आस्थापना शुल्क व एक टक्के सोयीसुविधा शुल्क देण्यात येत असून तिरोडा येथील धापेवाडा उपसा सिंचन योजने करता संपादित करण्यात आलेले जमीनी संबंधाने जिल्हास्तरीय समितीतर्फे निश्चित करण्यात आलेले जमिनीचे एकूण १७ गट आराजी १.८४ हेक्टर जमीन संपादित करण्यात येउन या जमिनीचा मोबदला शासना तर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आल्याने या कार्यालयातर्फे संबंधित शेतकºयांना हा मोबदला देण्यात आला.
यामुळे शासन निर्णयानुसार २ टक्के आस्थापना शुल्क १,६२,२५५ रुपये, १ टक्का सोयी सुविधा शुल्क ८१, १२८ रुपये व ३०, ००० जाहीरात खर्च असे २, ७३, ३८३ रुपये पी.एल.ए. खात्यामध्ये जमा करण्यात यावी असे पत्र १८/३/२०२१ रोजी व त्यानंतरही वारंवार धापेवाडा उपसा सिंचन योजना कार्यालयाकडे उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले. मात्र आजपर्यंत या कार्यालयातर्फे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयातील पी.एल.ए .खात्यात जमा करण्यात आली नाही. याबाबत धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता अंकुर कापसे यांना विचारणा केली असता त्यांनी चुकून ही रक्कम जमा करण्यात आली नसावी, आपण याबाबत मुख्य कार्यालयाकडे मागणी करून तिकडून रक्कम येताच उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे खात्यात ही रक्कम जमा करू असे सांगितले आहे.