भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तक्रार करायला गेलेल्या पिडीत तरूणीला शरीर सुखाची मागणी करणाºया भंडाºयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना बडतर्फ करण्यासंबंधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलीस महासंचालक व पोलीस उपमहानिरिक्षक यांचेशी चर्चा केली. लाखनी तालुक्यातील पिडीत तरूणी ही अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होती. त्यावेळी तिची ओळख एका तरूणासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र तरूणाने लग्नास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. तरूणीने लग्नासाठी त्याला गळ घातली. त्यावेळी त्याने लग्नास नकार दिली. खचलेल्या तरूणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. तरूणी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अशोक बागूल यांचेकडे गेली असता त्यांनी शरीर सुखाची मागणी केली. अशा पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाºयांचे हे कृत्य घृणास्पद असून अशोभनिय आहे अशा अधिकाºयांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे. अशा बेजबाबदार पोलीस अधिकाºयावर कठोर कारवाई होणे आवश्यक असून भंडारा पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक बागूल यांना तत्काळ निलंबित करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलीस महासंचालक व पोलीस उपमहानिरिक्षक यांचेशी चर्चा करून केली आहे.