मान्सूनचे मुंबईत आगमन; दोन दिवसांत विदर्भात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो नैऋत्य मौसमी पाऊस अर्थात मान्सून अखेर रविवारी मुंबईत दाखल झाला. दोन दिवसांपूर्वीच मान्सूनचे मुंबईत आगमन झाले असून, हवामान विभागाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. येत्या १२ तासांत मुंबईत ढग दाटून येणार येतील व तुफान पाऊस कोसळणार आहे. विदर्भात दोन दिवसांत म्हणजे ११ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरवर्षी सर्वसामान्यपणे ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो.

मात्र, यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून शहरात दाखल झाला आहे. आता हळूहळू राज्याच्या इतर भागांतही सकिह्यय होणार आहे. रविवारी पहाटे मुंबईसह उपनगरात अचानक पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हवेत गारवा पसरला. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात पाणी साचले. पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे पालिकेच्या नालेसफाईवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे या पावसाचा फटका लोकल ट्रेनलाही बसला. रुळावर पाणी साचल्याने लोकलचे वेळापत्रकही कोलमडले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *