ट्रक व एसटी बस ची धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी खापा/तुमसर : तुमसर आगाराची बस भंडारावरून तुमसर कडे येत असताना चौफुली येथे ट्रक व बस मध्ये धडक झाली ही घटना आज ९ जून ला सायंकाळी ४.१० वाजता घडली .या अपघातात एसटी बसमधील २४ प्रवासी थोडक्यात बचावले. बस क्रमांक एमएच १४ -केक्यू/८९७१ व गोंदिया कडून रामटेककडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच ०४/एचडी -९६०७ यांच्यात धडक झालीत्यामध्ये एकूण बस मधील २४ प्रवासी थोडक्यात बचावले .

\या अपघातात एसटीच्या खिडक्यांची काचे पुर्णपणे फुटली.व एसटीच्या चाकासमोरील भाग चेंदामेंदा झाला. भंडारा वरून येणारी बस तुमसर कडे जात होती परंतु धडकेमुळे तिच्या समोरील भाग रामटेकच्या दिशेने झाला . काही प्रवासी किरकोळ जखमी. झाले. घटनेची माहिती तुमसर पोलीस स्टेशनला देण्यात आले पुढील तपास सुरू आहे.काही दिवसा अगोदर तुमसर आगार येथे एसटीचा वर्धापण दिनसाजरा करण्यात आला. त्यावेळी याच एसटी बसचे सज- ावट करून पूजन करण्यात आले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *