भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ती शिक्षण घेणारी कोमल मुलगी, नागपुर येथे अभियांत्रिकी विषयात शिक्षण घेत आहे. प्रियकराने तिला लग्नाला नकार दिल्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्याकरीता उपविभागिय जिल्हा पोलिस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे गेली असता त्यांनी आपल्या पदाचा दुरपयोग करुन तिला शरीर सुखाची मागणी केली. जर अशा पध्दतिने जनतेचे रक्षक जनतेचेच भक्षक झाले तर जनतेनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद कुणाकडे मागायची असे अनेक प्रश्न जनतेपुढे निर्माण झाले आहे. अशा जनतेचे भक्षण करणाºया अधिकाºया विरोधात शासनाने कठोर कार्यवाही करुन अशा अधिकाºयाला सेवेतुन तडकाफडकी बडतर्फ करावे अशा आशियाचे निवेदन भंडारा शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रशांत देशकर, प्रदेश कांग्रेस कमेटी सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे, जिल्हा महासचिव सोहेल अहमद, नरेंद्र साकुरे, माजी नगर सेवक किशोर राऊत, योगेश कुंभारे इत्यादि कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांना दिले.
‘त्या’ अधिकाºयाला सेवेतुन बडतर्फ करा
