भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : हैदराबाद वरून मध्यप्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाºया खासगी ट्रॅव्हल्स बसला गोंदियागोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ आज दि. १० जून रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एका मजूराचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर तर ६ जण किरकोळ जखमी झाले. थानसिंग यादव (वय ३० रा. रेलवाडी जि. बालाघाट, म.प्र.) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रॅव्हल्स चालक मोहित उमाप्रसाद किरसान (रा. उगली/ शिवनी म.प्र.) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेश राज्यातील लांजी येथून हैदराबाद करिता खासगी ट्रॅव्हल्स चालविण्यात येत असून दरदिवशी शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात.
दरम्यान, हैदराबाद येथे कंस्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्यप्रदेश राज्यातील अनेक मजुरांची हैदराबाद येथे ने-आण करण्यात येते. त्यातच आज सोमवारी सकाळी हैदराबाद वरून जवळपास ७० ते ८० प्रवाशांना घेऊन लांजी येथील पायल ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी १३ पी ७९९९ परत लांजीकडे जात असताना गोंदिया व गोरेगावच्या मध्ये राष्ट्रीय महामार्गावर मिलटोली परिसरात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले.
यावेळी, रस्त्याच्या कडेवरील राहुल राईस मिलच्या मजुरांच्या क्वार्टरला बस धडकली. ज्यामध्ये ट्रॅव्हल्स मध्ये सवार असलेले १२ मजूर गंभीर जखमी झाले. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळ गाठल आणि यावेळी, सर्व जखमींना गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असताना थानसिंग यादव याचा ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. तर ११ गंभीर प्रवाश्यांवर उपचार सुरु असून ६ किरकोळ