वृत्तसंस्था नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी तिसºयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाचा कारभार हाती घेतला आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक चालू झाली आहे. या बैठकीत खातेवाटपदेखील करण्यात आले आहे. मोदींच्या तिसºया मंत्रिमंडळात जुन्या काही नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत. जसे की, अमित शाह यांच्याकडील गृह विभाग, राजनाथ सिंह (संरक्षण), निर्मला सीतारामण (अर्थ), एस. जयशंकर (परराष्ट्र) आणि नितीन गडकरी यांच्याकडील रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. तर भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय सोपवण्यात आले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद काढून घेत केंद्रात बोलावणं धाडलेल्या शिवराज सिंह चौहान यांना कृषीमंत्रिपद देण्यात आले आहे.मोदींच्या तिसºया मंत्रिमंडळात महाराष्ट्राला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. नितीन गडकरी (भाजपा) आणि पीयुष गोयल (भाजपा) या दोघांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर चार नेत्यांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत. यामध्ये रक्षा खडसे (भाजपा), मुरलीधर मोहोळ (भाजपा), प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट), रामदास आठवले (आरपीआय) यांचा समावेश आहे.
गडकरींकडील जुने खाते कायम, नड्डांकडे आरोग्य,केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप जाहिर
