भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे ध्वजारोहण कार्यक्रम प्रदेश सचिव विनोद हरिणखेडे व जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे वाचन करून साजरा करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्यांना खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. हा पक्ष शेतकरी, शेतमजूर यांचा असून प्रफुल पटेल यांनी नेहमी सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून काम केले आहे.
माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात पक्षाची वाढ व विस्तार करण्यासाठी बूथ स्तरावर संघटन मजबूत करावे असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले. यावेळी सर्वश्री विनोद हरिनखेड़े, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, यशवंत गणवीर, बालकृष्ण पटले, नानू मुदलियार, केतन तुरकर, किशोर तरोने, प्रभाकर दोनोडे, मनोज डोंगरे, राजू एन जैन, अजय उमाटे, नीरज उपवंशी, विनित सहारे, सचिन शेंडे, किरण पारधी, भगत ठकरानी, मनोहर वालदे, कमलबापू बहेकार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.