भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया शहरात ४ लोकांनी देवाण घेवाण ला घेऊन प्राणघातक हल्लात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. महेश दखने (वय ३५ रा. छोटा गोंदिया) असे मृत युवकाचे नाव आहे. तर आरोपी मध्ये देवेंद्र उर्फ देवा कापसे वय ४८ वर्ष, रा. फुलचुर, गोंदिया, सुरेश मटाले वय ३२ वर्ष रा. शिवनी आमगाव, मोरेश्वर मटाले वय २६ वर्ष रा. आमगाव, नरेश तरोने रा. फुलचुर नाका गोंदिया असे आहे, मृत युवक हा जमीन खरेदी-विक्रीची कामे करीत असून शहरातील पतंगा चौक ते तिरोडा बायपास रोड परिसरातील किसान चौक, छोटा गोंदिया येथील जानवी आॅटो रिपेअरिंग सेंटरच्या बंद दुकानात रविवारी ९ जून ला सकाळी १० वाजेच्या सुमारास महेश दखने हा आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच ३५ एव्ही ९५५०) ने गेला असता त्या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या काही आरोपींनी त्याचा घेराव करून त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हातोडानी वार केले.
यामध्ये महेश दखणे हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. घटनास्थळावरून आरोपींनी पळून गेले होते. उपचारादरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलीस घ घटनास्थळ व रुग्णालय गाठून पंचनामा केला. असुन पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मृत महेश दखणे हा जमिनीची खरेदी-विक्रीचे आर्थिक देवाण घेवाण लाघेऊन वादातून हल्ला करण्यात आला.
चार आरोपींना अटक केली असून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप.क्र. ३६५/२०२४ कलम ३०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून १५ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आले आहे. या कामगिरी मध्ये श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री नित्यानंद झा, अपर पोलिस अधिक्षक, श्रीमती रोहीनी बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, स.पो.नि. संजय पांढरे, पोउपनि मंगेश वानखडे, पोउपनि सैंदाने, पोउपनि चन्नावार, पाउपनि थेर, पो.हवा. जागेश्वर उके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, म.पो.हवा. रिना चौव्हाण, पो.शि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार, पोहवा. श्यामकुमार कोरे, संतोष भेंडारकर यांनी केली आहे.