भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहरात पावसाळा आला की, गोंदिया शहरात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण व्हायची यालाच बघता गोंदिया नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अॅक्शन मोडवर आले असुन मान्सूनपूर्व गोंदिया शहरातील नालेसफाईवर जोर दिला आहे. त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील अंडरग्राउंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने लोकांना येजा करण्यासाठी मार्ग बंद होत असे तर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठिकाणी विशेष लक्ष देऊन या ठिकाणी संपूर्ण नालीसफाई व गाळ काढण्याचे काम पूर्ण केले आहे. त्याच प्रमाणे गोंदिया शहरातील अनेक नाल्यांमध्ये गाळ काढण्याचे काम व सफाई नगरपरिषद द्वारे करण्यात आली आहे. तर आता पर्यंत ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे त्याच प्रमाणे येत्या ४ ते ५ दिवसात १०० टक्के काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे. तर यावर्षी गोंदिया शहरात मान्सून आल्यावर कुठेही पूर परिस्थिती निर्माण होणार नाही असे आश्वासन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल बल्लार यांनी दिले आहे.