भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : गेल इंडिया कंपनी लिमिटेड तर्फे टाकण्यात येत असलेले गॅस पाईपलाईनचे सर्विस स्टेशन कच्चा पालडोंगरी येथील शेतकरी भावांची संपादित करण्यात आलेले शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी परिवार आपले शेतात ठाण मांडून बसला यामुळे उपविभागीय अधिकारी तहसीलदार व गेल इंडिया कंपनीचे अधिकारी मोठा पोलीस स्थापना घेऊन आले असले तरी गावकºयांचे मदतीकरिता जिल्हा परिषद सदस्य पवन पटले तिरोडा पंचायत समिती उपसभापती हुपराज जमईवार व पालडोंगरी वासी धावून आल्याने प्रशासनाचा बेत उधळून लावण्यात आला.
तिरोडा तालुक्यातून जात असलेले गॅस पाईपलाईनचे सर्विस स्टेशन करिता पालडोंगरी येथील दोन शेतकरी बंधूंची ०.५६.२५ हेक्टर आर जमीन शासना तर्फे संपादित करण्यात येऊन १९ लक्ष रुपये मोबदला मंजूर करण्यात आला मात्र हा मोबदला अत्यल्प असल्याने तसेच या दोन्ही शेतकरी बंधूचे परीवारात दिव्याग व्यक्ती असुन त्यांना उदर निरव्हारा करता ईतर साधन नसल्याने आपलीं जमीन देणार नाही असा पवित्रा घेऊन लहान बालका सह संपूर्ण परीवार आपले शेतात ठाण मांडून बसले असता जिल्हाधिकारी गोंदिया यांचे अंतिम आदेशानुसार आज दिनांक ११ रोजी प्रभारी उपविभागीय अधिकारी तिरोडा वरूनकुमार शहारे, तहसीलदार गजानन कोकुडे व गेल इंडिया कंपनीचे सुनील हलदार, प्रमोद कुमार, राहुल कुमार ,मोठ्या पोलीस ताफ्यासह शेतकºयाच्या जमिनीत मार्किंग करण्याकरता आले असता या शेतकरी बंधूचे परिवारांनी ठाण मांडून बसल्याने पोलीस बंदोबस्त असतानाही गेल इंडिया कंपनीचे कर्मचाºयांना येथे मार्किंग करणे शक्यहोत नव्हते ज्यामुळे बळाचा वापर करण्याचा प्रयत्न करून पुरुष शेतकºयांना पोलिसांनी पोलीस गाडीत बसवल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य पवन पटले व पंचायत समिती तिरोडा उपसभापती हुपराज जमईवार यांना मिळाली.
त्यांनी त्वरित तेथे धाव घेऊन उपविभागीय अधिकारी व गेल इंडिया कंपनीचे अधिकाºयांना आपण आज मार्किंग न करता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी बोलून यातून मार्ग काढू असे सांगितले मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याने गावकºयांनी मार्किंग करण्या आलेले कर्मचाºयाना रोखण्याचा प्रयत्न करून पळवून लावल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली मात्र जि प सदस्य व उपसभापती यांनी परत विनंती करून जिल्हाधिकाºयांशी बोलून ही कारवाई थांबवण्याची सांगितल्यावरून प्रशासनातर्फे जिल्हाधिकाºयांशी बोलून १८ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत सभा ठेवून मार्ग काढण्याचे ठरवण्यात आल्याने या शेतकºयाचे शेतात मार्किंग करण्याचे काम थांबवण्यात आल्याने पालडोंगरी वासी, जिल्हा परिषद सदस्य व उपसभापती यांचे मुळे शेतकºयांचे शेतात जबरदस्तीने मार्किगं करण्याचा प्रयत्न स्थगित करण्यात आला.