भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनी टाकळी येथील वैनगंगा नदी काठापासून तर सूर नदीच्या काठापर्यंत शेतकºयांना ये-जा करण्यासाठी सरकारी पांदन रस्ता नकाशावर आहे . याच पांदण रस्त्यावरून सर्व शेतकरी आपल्या शेतात ये-जा करित असून शेतात रोहिणी च्या कामासाठी ट्रॅक्टर , हार्वेस्टर मशीन ,बैल-बंडी याच मागार्ने ने आण करीत असतात परंतु जयशंकर हेडाऊ या शेतकºयने मोजणी न करता संपूर्ण सरकारी पांदन रस्त्यावर माती घातली. त्यामुळे हा पांदण रस्ता अरुंद झाला असून. शेतकºयंना या रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले आहे. आता पावसाळयाला सुरूवात झाली असून रोहिणीची नक्षत्र सुरू झाले आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असुन. शेतात धानपिकांच्या रोवणीसाठी पºहे घालावयाचे आहे. त्यासाठी नांगरटी करणे आवश्यक असुन शेतात ये-जा करण्यासाठी असलेल्या सरकारी पांदण रस्त्यावर हेडाऊ यांनी माती टाकुन रस्ता अरुंद केल्याने शेतकºयांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे.
करीता शेतात जाणारा पांदण रस्ता तात्काळ मोकळा करून शेतकºयांना ये-जा करणकरीता उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी जे .पी. लोंढे यांनी निवेदन स्विकारले. निवेदन देतांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे , नितेश बोरकर, गोपाल देसकर, शंकर वाघये, दादाराम गायधने, भरत भेदे, मनोज गायधने, शिवलाल राहाटे, विनोद राहाटे, किसन राहाटे धनराज राहाटे यांनी तसेच खमाटा टाकळी येथील शेतकरी उपस्थित होते.