भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया नागपूर शाखा पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या ‘नो हॉंकिंग’ मोहिमेला जनसंपर्क सोसायटी आॅफ इंडिया सहकार्य करणार आहे. पीआरएसआय नागपूर चॅप्टरच्या अधिकाºयांनी सोमवारी, १० जून रोजी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आयुक्तांनी पीआरएसआयच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि जनजागृतीसाठी सहभागी होत असल्याबद्दल स्वागत केले. चर्चेदरम्यान पीआरएसआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम) श्री.एस. पी.सिंग, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष यशवंत मोहिते, सचिव मनीष सोनी, सहसचिव प्रसन्न श्रीवास्तव, खजिनदार शरद मराठे, वरिष्ठ अधिकारीडॉ. मनोजकुमार, अनिल गाडेकर आदी उपस्थित होते. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालये आणि तरुणांसाठी चर्चासत्र, पोस्टर, घोषवाक्य, व्हिडीओ रिल्स व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे पीआरएसआयच्या अधिकाºयांनी सांगितले.