४ अट्टल चोरट्यांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा विभागाने चार अट्टल चोरट्यांना ताब्यात घेत जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण ११ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. आरोपींच्या ताब्यातुन पोलीसांनी ३ मोटरपंप , ४ मोटरपंप (डिजेल इंजीन) व २ मोटरसायकल असा एकूण १ लाख २ हजार रूपांचा मुद्देमाल जप्त केला. रोहीत सिध्दार्थ खोब्रागडे, वय २० वर्ष, धंदा मजुरी, सत्यपाल सिध्दार्थ खोब्रागडे, वय ३१ वर्ष, धंदा मजुरी, शंकर चिंदु भोयर, वय २४ वर्ष, धंदा मजुरीं व हिरामन धनराज वाघाडे, वय ४५ वर्ष, धंदा कबाडी खरेदी विक्री, सर्व रा. किटाडी ता. लाखनी जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.

जिल्हयातील पालांदुर, साकोली, आंधळगाव, लाखनी, पवनी, अडयाळ, कारधा व करडी पोलीस स्टेशन अंतर्गत मागील अनेक दिवसापासुन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भंडारा स्थागुशा विभागाचे पथक आरोपींच्या शोधकामात अलर्ट मोडवर होते. दरम्यान १० जून रोजी एका मोटारपंप चोरीच्या घटनेसंदर्भात तपास करीत असतांना भंडारा स्थागुशा विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी रोहित सिध्दार्थ खोब्रागडे, सत्यपाल सिध्दार्थ खोब्रागडे ,शंकर चिंदु भोयर व हिरामण धनराज वाघाडे सर्व रा. किटाडी यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी १) पो.स्टे. साकोली अप.क्र. १५/०२४ कलम ३७९ भादवि., २) पो.स्टे. साकोली अप.क्र. २७/०२४ कलम ३७९ भादवि., ३) पो.स्टे. आंधळगाव अप.क्र. २१/०२४ कलम ३७९ भादवि., ४) पो.स्टे. लाखनी अप.क्र. १८/०२४ कलम ३७९ भादवि., ५) पो.स्टे. पालांदूर अप.क्र. ९३/०२४ कलम ३७९ भादवि., ६) पो.स्टे. पालांदूर अप.क्र. ९१/०२४ कलम ३७९ भादवि., ७) पो.स्टे. पवनी अप.क्र. १९६/०२२ कलम ३७९ भादवि., ८) पो.स्टे. अड्याळ अप.क्र. ६६/०२४ कलम ३७९ भादवि., ९) पो.स्टे. कारधा अप.क्र. १५५/०२४ कलम ३७९ भादवि., १०) पो.स्टे. अड्याळ अप.क्र. ४९/०२४ कलम ३७९ भादवि व ११) पो.स्टे. करडी अप.क्र. ३४/०२४ कलम ३७९ भादवि. अशा ११ गुन्ह्यांची कबुली दिली.

आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ०३ मोटरपंप, ०४ (डिजेल इंजीन) मोटरपंप, ०२ मोटरसायकल एकूण किंमती १ लाख २ हजार रु. चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पथकाने जप्तीपत्रकाप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला आहे.आरोपींना पुढील तपासाकरीता पालांदुर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा स्थागुशा पो. नि. नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. किशोर मेश्राम, पो.अं. सचिन देशमुख, पो.अं. कृणाल कडव, पो.अं. योगेश ढबाले, चापोना. आशिष तिवाडे, चापोअं कौशिक गजभिये यांनी केली .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *