रेल्वे क्रॉसिंग जवळ आढळला मृतदेह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- आमगाव-देवरी रोडवरील बामणी रेल्वे क्रॉसिंग जवळ एक मृतदेह आढळला असून त्याचे पाय गमछाणे बांधले असून रेल्वेच्या धडकेने त्याच्या मृत्यू झाला की घातपात असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतक राजू शिवणकर ५७ वर्ष हा भजेपार येथील रहिवासी असून रात्रीपासून बेपत्ता होता आणि आज त्याच्या मृतदेह भजेपार गावापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या बामणी रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वे रूडावर आढळला त्याच्या डोक्याला जखम असून त्याचे पाय बांधले असल्याने हा घातपात आहे का ? असा संशय बडकवला आहे. आता याचा तपास सध्या आमगाव पोलीस करणार आहे. मृतदेह उच्चस्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे नेण्यात आला आहे, या घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *