भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांना वाहतुक व दळनवळनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात,या उदात्त हेतुने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गाव तिथे रस्ता तयार केला जात आहे. मात्र हे रस्ते कसे गुणवत्ता हीन तयार केले जातात याचा प्रत्यय तुमसर तालुक्यातील रस्त्यांची चाळण झालेली बघावयास मिळत आहे. परिणामी ह्या रस्त्यांना अतितात्काळ नियोजनात समाविष्ट करून मंजुर रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा तर्फे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे.
कित्येकांना अपघातांला बळी पळावे लागले आहे. तर अपघाताची श्रृंखला अजूनही सुरूच आहे. त्यामुळें सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे . यातील काही रस्ते प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाचे तर काही रस्ते राज्य मार्ग आहेत . या सर्व रस्त्यांना अतितात्काळ नियोजनात समाविष्ट करून मंजुर करण्यात यावे अशी मागणी जिल्हा अध्यक्ष रा.यु.काँ. शरद पवार गटाचे ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली व कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रा. काँ. शरद पवार गट जिल्हाध्यक्ष किरण अतकरी,जि.प. सदस्य तथा रा.काँ. विधानसभा अध्यक्ष एकनाथ फेंडर, उप कार्यकारी अभियंता चुर्रे व कनिष्ठ अभियंता हतीमारे सह रा कॉं. पदाधिकारी उपस्थित होते.