भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा : रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीचे नाते हे कितीतरी मोठे आणि उदात्त असते. पण त्याचे मर्म प्रत्येकाच्या ठायी असतेच असे नाही. जात, धर्म आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन गरजवंतांना रक्तदान करणाºया शहरातील रक्तदात्यांनी मात्र, या नात्यांची विण घट्ट केली आहे. रक्त हे प्रत्येकांच्या धमण्यांमधून वाहते. परंतु, सुदृढ व निरोगी असूनही रक्तदान करण्याकडे लोकांचा संकुचित दृष्टीकोण दिसून येतो.
आपल्या कुटुंबीयांना रक्ताची गरज असताना स्वत: रक्तदानासाठी पुढाकार न घेता दुसºयाकडे धाव घेणाºयांची संख्या अधिक आहे. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून रक्तदान करणारे रक्तदाते असले तरी रक्ताच्या मागणीच्या तुलनेत हाआकडा किती तरी कमी असल्याने दिसते. कोरोनाकाळात तर ही परिस्थिती अधिक गंभीर होती. त्यामुळे सातत्याने रक्तदान करणाºया नेहमीच्या रक्तदात्यांवरील ताण वाढला आहे. नव्या रक्तदात्यांनी समोर येण्याची गरज निर्माण झाली आहे.
दाते कमी आणि याचक अधिक
आजही लोकसंख्येच्या तुलनेत रक्तदान करणाºयांची संख्या कमीआहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रक्तपेढीत नेहमीच रक्ताचा तुटवडा असतो. तेथे स्वच्छेने रक्तदान करणाºयांना डोनर कार्ड दिले जाते. परंतु, या कार्डवर अपवाद वगळता वेळेवर कधीच रक्त उपलब्ध होत नाही, असा अनेकांचाअनुभव आहे.
खासगी रक्तपेट्याचाही कटू अनुभव
सामाजिक जाणिवेतून काही संस्था तर काही नेत्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करतात. या शिबिरातशासकीय, खासगी रक्तपेढ्या रक्तसंकलन करतात. बहुतांश वेळा यात नागपूरच्या रक्तपेढ्यांचा समावेश असतो. संकलीत केलेले सर्व रक्त बाहेर नेले जाते. अशावेळी शहरातील वा जिल्ह्यातील गरजू रुग्णांना त्याचा उपयोग होत नाही. त्यांना वेळेवर रक्तदाता उपलब्ध होणेही कठिण होवून बसते. शहरात दोन खासगी रक्तपेढया आहेत. खासगीत रक्तासाठी दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागतात. डोनर कार्ड देऊनही हजार ते दिड हजार रुपए शुल्क घेतले जाते.
“रक्तदात्यान मध्ये सुद्धा माणुसकी पाहायला मिळते माज्या एका फोनवर कोणीही रक्त द्यायला तयार होते आज पर्यंत किती तरी मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रक्तदान केले आहे. आता काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती रक्तासाठी फिरत होता त्याला मी रक्त जमवून दिला व त्याचा बहिणीचा प्राण वाचला. सर्वांना एकच सांगतो की तुम्ही पण रक्तदान करा व आपल्या जवळच्या सर्व लोकांना रक्तदान करायला सांगा.”
-गोवर्धन भ. निनावे अध्यक्ष युवा शक्ती संघटना भंडारा रक्तदाता, भंडारा