शासनाने सर्वच शेतकºयांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शासनाने सर्वच शेतकºयांना अतिवृष्टीची सरसकट नुकसान भरपाई द्यावी यासाठी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काल दि.१२ जून ला जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांची मंत्रालय मुंबईत भेट घेतली.गेल्या दोन महिन्यांत भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकºयांच्या रब्बी पिकाचे ९० टक्के नुकसान झाले . दर आठवड्याला पडणाºया पावसामुळे जिल्ह्यातील अनेक हेक्टर भातशेती भुईसपाट झाली असून, त्याचा खर्चही काढणे कठीण झाले आहे.त्यामध्ये तुमसर व मोहाडी तालुक्याला जास्त फटका बसला आहे. जिल्हाधिकारी भंडारा यानी आपल्या स्तरावरुन काढलेल्या आदेशानुसार कर्मचाºयानी शेतात जाऊन पंचनामा जरुर केला. परंतू नुकसान भरपाई साठी राज्य सरकारने तसे आदेश अजूनही दिलेले नाही. मागील महिन्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटी मुळे रब्बी पिकांसह भाजीपाला,आंबा ई.पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

अशा सर्व शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई राज्य सरकार ने जाहीर करावी. अशी मागणी किसान मोच्यार्चे प्रदेश सरचिटणीस माजी खा.शिशुपाल पटले यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना लेखी निवेदनाद्वारे केली होती.परंतु आज पावेतो तसे आदेश राज्य सरकारकडून निघालेले नाहीत.आचार संहितेचा कारणाने सरकारला निर्णय घेता आला नसेल परंतु आता सरकारने त्यावर निर्णय घ्यावा यासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पुढाकार घेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयकुमार गावित यांची नुकतीच मुंबईत भेट घेटली व येत्या २७ जून पासून होणाºया पावसाळी अधिवेशनात नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांकडून शेतकºयांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.येत्या अधिवेशनात यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *