भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवुन तिला आपल्या पे्रमजाळ्यात अडकावुन तिच्याशी शारिरिक संबंधत प्रस्थापीत करून नंतर मात्र लग्न करण्यास नकार देणाºया आरोपीविरोधात भंडारा पोलीसात अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आषिक खुशदिल खोब्रागडे वय ३१ वर्षे ह.मु.विद्यानगर गुजराती कॉलोनी भंडारा असे आरोपीचे नाव असुन तो भारत फायनान्स या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहे. पिडीत महिला भंडारा शहरातील रहिवासी असुन भंडारा शहरातील भारत फायनान्स या कंपनीत मॅनेजर पदावर असलेल्या आषिक खुशदिल खोब्रागडे याच्याशी कामानिमित्त ओळख झाली. त्यावेळी पिडीतेने कर्ज मिळावा म्हणून भारत फायनान्स कंपनीकडे अर्ज केला होता त्यामाध्यमातुन आरोपी आषिक खोब्रागडे यांच्याशी पिडीत महिलेची ओळख झाली.आरोपीने पिडीतेला ३० हजार रुपयाचे कर्ज मिळवून दिले. नंतर हळुहळु फिर्यादी व आरोपी यांच्यात मोबाईलवर मॅसेज करणे, बोलणे सुरू झाले .
दरम्यान आरोपीने पिडीतेला मी तुझ्याशी प्रेम करतो ,मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, मी तुझ्या मुलांचा सांभाळ करण्यास तयार आहे असे प्रलोभन देऊन तिला विश्वासात घेतले. पिडीतेला प्रेमाच्या जाळ्यात अडकावुन पिडीतेशी सन २०१९ पासून शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान मागील काही दिवसापासुन त्याने पिडीतेला टाळण्यास सुरूवात केली.तसेच पिडीतेला धमकावुन तीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आता आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पिडीत महिलेने भंडारा पोलीसात तक्रार नोंदविली. भंडारा पोलीसांनी आरोपी आषिक खुशदिल खोब्रागडे याच्या विरोधात भादवी कलम ३७६ (२)( ह )५०४, ५०६, अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहे