भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : पावसाळा अवघ्या तोंडावर असताना नगर पालिकेला अनेकदा लेखी तथा तोंडी सूचना करूनही प्रशासन मान्सून पूर्व तयारीला लागलेले नाही. नाल्यातील गाळ, नाली लगतचे झुडपी वनस्पती, शहराबाहेर सांडपाणी वाहून नेणाºया मोठ्या नाल्या, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे, पाण्याखाली येणारे रस्ते, प्रभाग तसेच कचºयाची विल्लेवाट सध्या कासव गतीने सुरू आहे. त्याकरिता माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पालिका प्रशासनाला गत काळातील भयावह पुर परिस्थिती तसेच स्थानिकांच्या समस्यांशी अवगत करून देखील प्रशासक राजवटीत सामान्य नागरिकांच्या समस्यांना पालिका दुजोरा देत असल्याची संतप्त टीका पडोळे यांनी केली आहे. पालिकेला निवेदन देते वेळी पडोळे यांच्या सह भाजपचे गिता कोंडेवार, कुंदा वैद्य, कल्याणि भुरे, पंकज बालपांडे, सचिन बोपचे, आशीष कुकडे, प्रिति मलेवार, राजकुमार मरठे, शोभा लांजेवार, योगेश रंगवानी, कृष्णा पाटिल, पवन पाटील, निशीथ वर्मा, अनुज मलेवार, शांता सार्वे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.