भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची अवैध वाहतूकीवर कारवाई करुन गोवंशाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी इअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गोवंश जनावरांच्या सुरक्षितेसाठी इयर टॅगिंग करुन घ्यावे, अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी संबंधिताना निर्देश दिल्या. प्र. जिल्हाधिकारी श्रीमती. पठाण म्हणाले की, येत्या सोमवारी बकरी ईद साजरी होणार असून जिल्हा पशु संवर्धन विभागाने मनुष्यबळाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये अधिकृत कत्तलखाने नाही.जनावरे अवैध विक्रीबाबतची माहिती पोलीस प्रशासनाने घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. प्राणीक्लेष प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात याव्यात. तसेच सर्व लहान-मोठ्या पशुधनाला १ जून पासून ईअर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कानातील बिल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री व वाहतूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पशुधनाची इअर टॅगिंग करण्याबाबत शहरी तसेच ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करावी.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमानुसार कोणत्याही प्रकारचा गोवंश जसे गाय, बैल या प्राण्यांची कत्तल करण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे. या कायद्याचे पालन करण्यासाठी सदर समितीच्या सदस्यांमध्ये चर्चा करण्यात आली. त्यावर उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. वाय. एस. वंजारी यांनी नगरपरिषद क्षेत्रामध्ये जिल्हा वैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे व प्रत्येक पशुदवाखान येते.करण्यात येत असल्याचे सांगितले. बकरी ईदच्या अनुषंगाने शहरात जनावरांच्या तपासणीसाठी बॉर्डर सिलींग ठिकाणी तपासणीकरिता पोलीस व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देश श्रीमती. पठाण यांनी यावेळी दिले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस यांनी योग्य समन्वय ठेवून अवैध वाहतूकीवर कडक कारवाई करावी.
यासाठी शहरी व ग्रामीण भागातील पोलीस चौकीवर कडेकोट बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच १७ ते २०0 जून, २०२४ दरम्यान पशुसंवर्धन विभागाचे कर्मचाºयांना रजा मंजूर करु नये अशा सूचना जिल्हा उपायुक्त पशुसंर्वधन डॉ.वाय. एस.वंजारी यांनी दिल्या. यावेळी प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे शासकीय व अशासकीय सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे १३ जून, २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा उपआयुक्त पशुसंर्वधन डॉ. वाय. एस. वंजारी, उपजिल्हाधिकारी जे. पी. लोंढे, सहाय्यक आयुक्त, पशुसंर्वधन व संबंधित विभागाचे अधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाचे अधिकारी,व परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.