भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची आम. नरेंद्र भोंडेकर यांनी पाहणी केली. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकारी व कंत्रातदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सोबतच आवश्यक असलेल्या कामांची माहिती घेऊन ती कामे लवकरात लवकर मंजूर करवून सुरू करून घेण्याची हमी दिली. आ. भोंडेकर यांच्या प्रयत्नाने भंडारा शहरातच नाही तर संपूर्ण विधान सभा क्षेत्रात विविध विकासकार्ये सुरू आहते. यात भंडारा नगर परिषद अंतर्गत १६ प्रभागात होत असलेले विकास कार्यांचा आढावा घेण्याकरिता आम. भोंडेकर यांनी दौरा कार्यक्रम आखला. ज्यात त्यांनी शाहिद भगतसिंग शाळा, हुतात्मा स्मारक, जल शुद्धीकरण केंद्र, बलोद्याने, बावणे कुणबी समज भवन, संत रविदास मंदिर, आंबेडकर वॉर्ड येथील वाचनालय, शासकीय रुग्णालय, महिला रुग्णालय, उर्दू शाळा, मिसकिन टँक गार्डन, ई लायब्ररी, गोखले उद्यान, खांब तलाव, नवीन पेय जल योजना सोबत शहरातील रास्ते निर्माण व नाली निर्माण सह अन्य विकास कामांना भेट देवून कामच आढावा घेतला.
या वेळी भंडारा न. प.चे मुख्याअधिकारी करणकुमार चव्हाण यांचेसह अन्य विभागाचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते. आम. भोंडेकर यांनी पाहणी दरम्यान अधिकारी व कंत्राटदारांना कामाच्या गुणवत्तेविषयी सूचना केल्या.सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता उत्तम असावी जेणेकरून नागरिकांना वर्षानुवर्षे याचा उपभोग घेता यावा. तसेच कामांबद्दल कसलीही तक्रार येता कामा नये व सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना कसे सोयीचे होईल याकडे लक्ष देण्यात यावे. आम. भोंडेकर यांनी कामांचा आढावा घेत असतांना प्रत्येक प्रभागातील नागरिकांशी भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधून प्रभागात हव्या असलेल्या सुविधांबद्दल जाणून घेतले. उद्भवत असलेल्या समस्यांचा तोडगा लवकरच काढण्याचे आश्वासन दिले.