भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : प्रसिद्ध साहित्यिक व झाडीबोली चळवळीचे प्रणेते डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी नुकताच तयार केलेल्या ‘मराठी अंत्याक्षरी शब्दकोश’ या ग्रंथाची नोंद इंटरनॅशनल बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये झाली असून त्यांच्या साहित्य संपदेत मानाचा तुरा रोवला गेला आहे. मराठी साहित्यामध्ये त्यांचे हे साहित्य श्रृजन, नवीन दालान उघडणारे व इतिहास घडविणारे ठरल्यास नवल नासावे. डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांची ग्रंथसंपदा फार मोठी असून आतापर्यंत विविध विषयांवरील ग्रंथांसह १११ पुस्तके प्रकाशित आहेत. तर सामाईक विषयावरील काही ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. वºहाडी बोली प्रमाणे झाडीपट्टीतील झाडीबोलीला मान मिळावा म्हणून त्यांनी झाडीबोली चळवळ उभी केली. त्यांच्या ‘मराठी अंत्याक्षरी शब्दकोश’ या ग्रंथाने मराठी भाषा अभ्यासक, नवकवी व मराठी विशेषत: झाडीबोली लेखकांना सहायता निश्चितच मिळणार आहे. त्यामुळे अनेक साहित्यिक, मराठी भाषा अभ्यासक व पत्रकारांनी डॉ.बोरकर यांचे अभिनंदन केले.