भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज ओबीसी सेवा संघ व ओबीसी महिला सेवा संघाचे सर्व पदाधिकारी यांनी विश्राम गृह लाखनी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा व अभिनंदन दिले. यावेळी नवनिर्वाचित खासदार यांनी भंडारा गोंदिया क्षेत्रातील जनतेने माज्यावर जो विश्वास टाकला आहे, ज्या अपेक्षा केल्या आहेत ते सर्व प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले. याप्रसंगी ओबीसींची जातिनिहाय जनगणना, ओबीसी संख्येच्या प्रमाणात आरक्षण, प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती, पोष्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीगृह, इमारत बांधकाम, विदेश शिक्षण शिष्यवृत्ती, युवकांना रोजगार अशा विविध बाबींवर ओबीसी सेवा संघाच्या पदाधिकाºयांनी चर्चा केली. आपण समाजाचे प्रश्न व प्रामुख्याने जातिनिहाय जनगनणा संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात मांडून भंडारा-गोंदियाचा नाव लौकिक करावे अशी मागणीही यावेळी केली.
अध्यक्ष गोपाल सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी सेवा संघाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शक प्रभाकर वैरागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रदेश अध्यक्ष मंगला वाडिभस्मे, जिल्हा ओबीसी महिला संघ अध्यक्ष ललिता देशमुख, महासचिव संजीव बोरकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण पडोळे, अरुण जगनाडे, प्रा.उमेश सिंगनजुडे, प्रा.विष्णू जगनाडे, प्रा.दयाराम आखरे, रोशन उरकुडे, गोपाल देशमुख, भाऊराव वंजारी, सुभाष पाल, सुरेश वैरागडे, सुभाष खंडाईत, शुभदा झंझाड, लता बोरकर, स्वाती सेलोकर, जयश्री जगनाडे, शिल्पा खंडाईत, लक्ष्मण ईटनकर, बाबर वहिद शेख, गजानन पाचे, प्रकाश मुटकुरे, युवराज नंदनवार, मोहितकुमार देशमुख, सुशील भोगे, सुधाकर मोथालकर, अनिल शेंडे, निहाल भुरे, उमेश मोहतुरे प्रामुख्याने उपस्थित होते.