भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- सामाजिक कार्यकर्ते बालू ठवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर, रुग्णालयातील रूग्णांना फळ वाटप तसे वृक्षारोपण कार्यक्रम पवनी व भंडारा येथे नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रम कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार राजेंद्र भांडारकर, पत्रकार समीर नवाज, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सामाजिक कार्यकर्त्या पूजा ठवकर, अभय राऊत, अमोल जिभकाटे, प्रतिक कहु, अमोल लांजेवार, प्रभाकर सार्वे, गणेश गणवीर, अतुल भुरे, भिक्षुक वंजारी, अनिकेत सावरकर उपस्थित होते. बालु ठवकर हे अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहे. अशी त्यांची ओळख आहे. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय पवनी व शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आरोग्य शिबिर व गोरगरीब रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. अनेक रुग्णांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला. तसेच पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी सदैव पुढाकार घेत असतात. तसेच बालु ठवकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील असंघटित कामगार, गरजू निराधार, अपंग, निराश्रित व सर्व सामान्यांना न्याय मिळालेला आहे. म्हणून मित्र परिवाराच्या वतीने बालु ठवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर, फळवाटप व वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. तसेच त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सन्मानित करून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सूत्रसंचालन शुभम मोहरकर तर आभार मनोज चिचघरे यांनी मानले.