भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर रिले रूमच्या बाजूला असलेल्या बहुपयोगी साहित्य विकणाºया स्टॉलला आग लागली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घना टळली. ही घटना आज रविवार १६ रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास लागली. सिग्नल कर्मचाºयांनी सतर्कता दाखवत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वरील बहुपयोगी साहित्य विक्रीच्या दुकानाला ४ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. सिग्नल कर्मचाºयांना आगीचे लोळ दिसताच त्यांनी तत्परता दाखविली आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग विझवण्यासाठी एस. अॅण्ड टी. कडे असलेल्या अग्निशामक यंत्रणेच्या सहाय्याने कर्मचारी अहफाज पठाण, राजेश ढोबे यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. व
र्धा नगरपालिकाच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर स्टॉलला लागलेली आग आटोक्यात आणून बाजूच्या रिले रूमला आगीपासून वाचविण्यास यश आले. आगीत दुकान जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहेत. यापूर्वी इटारसी रेल्वे स्थानकावर अशाच प्रकारे घटना घडली होती. याची पुनरावृत्ती सेवाग्राम रेल्वे स्थानकावर घडली असती. मात्र, रेल्वे कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच नागपूर येथील डीआरएम सहित अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आग कशामुळे लागली याचा रेल्वे विभाग तपास करीत आहे.