भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. जूचा पंधरवाडा लोटला असताना अपेक्षित पाऊस पडला नाही. सालेकसा, आमगाव तालुक्यातील काही भागात शनिवार १५जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वादळी पावसाले हजेरी लावली. वादळाचा फटका आमगाव तालुक्यातील जामखारीला बसला. वादळामुळे घरावरील छत उडाले. शेतातील झाडे उल्मडून पडली. यावेळी गावात वीज पुरवठा खंडीत झाला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. यानंतर ७ च्या सुमारास मेघगर्जणेसह वादळी पावसाने हजेरी लावली. १५-२० मिनिटे बरसलेल्या पावसामुळे उकाळ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. आमगाव, सालेकसा तालुक्यात वादळामुळे काही गावांतील नागरिकांच्या घरावरील छत उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.