विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे असेल : प्रफुल्ल पटेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : लोकसभा निवडणुकीत एनडीएचा ४०० पारचा नारा चुकीचा नव्हाता. याचा विरोधकांनी अपप्रचार केला. मतदारांची दिशाभूल करून संभ्रम पसरवला. यामुळे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा येथे एनडीएला अपेक्षित यश मिळाले नाही, राज्याच्या आगामी विधान सभा निवडणुकीत चित्र वेगळे असेल, महायुतीला नक्कीच अपेक्षित येश मिळेल. असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. ते आज १६ रोजी येथील एनएमडी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते. पटेल पुढे म्हणाले, एनडीएला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास ते संविधान बदलतील असा विरोधकांनी जनतेत अपप्रचार केला.

संविधनाचा मुळ ढाचा कुणीच बदलूशकत नाही. या अपप्रचारामुळे जनतेने महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिला. राजकारणात जय-पराजय होतेच. मध्यप्रदेश, छतीसगड, आंध्रप्रदेश, ओरीसा, तेलंगणात आम्ही उत्तम कामगिरी केली. मराठा आरक्षण, कांदा निर्यात बंदी, कापूस, सोयाबिनचे पडलेले दर यामुळेही शेतकरीवर्ग नाराज होता, त्याचा फटकाही सत्ताधारी पक्षांना लोकसभा निवडणुकीत बसला. झालेल्या चुका शोधू, त्या सुधारू, आणि विधान सभेत उत्तम कामगिरी करून पुन्हा सत्तेत येऊ याची आपल्याला खात्री असल्याचे पटेल म्हणाले. मतदारांनी कामाची किमत केली नाही, तरीही आम्ही सकारात्मक भूमिका ठेवून सर्वसामान्यांसाठी काम करत राहू, राज्य सरकार लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार करणार आहे. यानंतर कामांना नक्कीच गती मिळेल. महिला, बेरोजगार तरुणांच्या कल्याणासाठी राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात योजना आणणार असल्याचे पटेलांनी सांगीतले. एनडीएचा १० वर्षाचा कार्यकाल यशस्वी होता. पुढे अनेक कार्य करायची आहेत. येत्या विधानसभेत चित्र वेगळे राहणार असल्याचे सागीतले. यावेळी पटेलांनी भंडारागोंदिया, गडचिरोली-चिमूरचे नव निर्वाचित खासदारांचे अभिनंदन करून त्यांनी या लोकसभा क्षेत्राचा विकास करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. पत्र परिषदेला अर्जुनी मोरचे आमदार मनोहर चंद्रीकापूरे, माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *