भंडारा पत्र्रिका / प्रतिनिधी भंडारा : खरीप हंगामाला सुरवात झाली असून कृषी केंद्रात बियाणे खत विक्री साठी उपलब्ध झालेले आहे. शेतकºयांना चांगल्या प्रतीचे बियाणे खत उपलब्ध व्हावे त्याकरिता भरारी पथकाची तपासणी सुरू असून यामध्ये आतपर्यंत १०० पेक्षा जास्त कृषी केंद्राची तपासणी झालेली आहे. तपासणी दरम्यान कृषी केंद्र मधे भाव फलक दर्शनी भागात न लावणे , साठा रजिस्टर अद्यावत न ठेवणे, विक्री साठी उपलब्ध असलेले बियाणे कंपनीचे उगमप्रमाणपत्र परवान्यात समाविष्ठ नसणे, बिल बुक वर विक्री केलेल्या निविष्ठा ची संपूर्ण माहिती नसणे,विक्री साठी उपलब्ध असलेले कंपनीची बियाणाचे सोर्स सर्टिफिकेट उपलब्ध नसणे ,रासायनिक खत पोस मशीन वरून न विक्री करता आॅफलाईन विक्री करणे .इत्यादी त्रुटी तपासणी दरम्यान निदर्शनांस आले.
सर्व बियाणे, खत , कीटकनाशक विक्रेते यांनी तालुका निहाय झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत कायद्याच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे अन्यथा तपासनी दरम्यान त्रुटी आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. शेतकºयांना निविष्ठा च्या अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा स्तरीय तक्रार निवारण भ्रमणध्वनी क्रमांक ७०५८२१७९७७ यावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० या कालावधीत संपर्क करावा असे आवाहन श्री व्ही एम चौधरी मोहिम अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी केले आहे.