भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : तालुक्यातील नागरिक तेंदूपत्ता संकलन करतात. मजुरांना गत हंगामाचा तंदूपत्ता बोनस मिळाले नाही. वारंवार मागणी करण्यात आली, आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याची दखल वन विभागाने घेतली असून कार्यालयाीन कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. जून अखेर मजूरांच्या बॅक खात्यात बोनसची रक्कम जमा होणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगीतले. मोरगाव तालुका वन संपदेने संपन्न आहे. नवेगाव-नागझिरा अभयारण्याअंतर्गत येणाºया बोळदे, बाराभाटी, सुकडी, येरंडी/ देव, कवठा, डोंगरगाव, देवलगाव, नवेगावबांध व इतर गावातील मजूर दर हंगामात हिंस्र वन्य प्राण्यांच्या सावटात तेंदपुत्ता संकलन करतात. ७० ते ८० पानांचा पुडा तयार करून कंपनीकडे जमा करतात. यासाठी मजूरांना ३०० ते ४०० रुपये मोबदला मिळतो. या कामाचा प्रोत्साहन म्हणून तेंदपुत्ता संकलन करणाºयांना वन विभाग बोनस देतो. मागील हंगामाचा तेंदूपत्ता बोनस अद्यापही मिळाला नाही. मजुरांनी वन विभागाचे कार्यालय गाठून वरिष्ठ अधिकाºयांना बोनसची मागणी केली. मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही. सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहीकर यांनी वनविभागाच्या अधिकाºयांना भेटून बोनस संदर्भात चर्चा केली. यावर वन विभागाने कारवाई सुरू केली असून जून अखेरपर्यंत मजुरांना बोनस देण्यात येणार असल्याची ग्वाही अधिकाºयांनी दिली.