दोन नराधमांचा मतिमंद तरूणीवर अत्याचार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आई-वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याने सूना मोका पाहून शेतीच्या कामाकरीता आलेल्या दोन युवकांनी एका २५ वर्षीय मतीमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना जवाहर नगर पोलिस स्टेशन अंतर्गत उघ डकिस आली आहे. सवींद्र गोपीचंद बारई, वय २८ वर्ष व जयदेव सोमाजी उरकुडे, वय ३३ वर्ष दोघेही रा. साहुली, ता.जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी साहूली या एकाच गावातील मित्र असून ते शेतीच्या कामावर मजुरीचे काम करतात. सध्या मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना वेग आला असून आरोपी दोन्हीं युवक पीडितेच्या शेतावर मजूर म्हणुन काम करण्यासाठी आले होते. ते मागील अनेक दिवसापासून या मतिमंद मुलीच्या मागावर असल्याची माहिती आहे. दि.१५ जुन रोजी पीडितेच आई वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे बघून सूना मोका साधून मतीमंद मुलीच्या घरात प्रवेश करीत तिच्यावर अत्याचार केला.हा प्रकार पीडित मतीमंद मुलीच्या बहिणीच्या लक्षात येताच तिने तत्काळ जवाहरनगर पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. जवाहर नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असून आरोपींवर भादवी कलम ३७६ (२) छ, ३७६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *