भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : प्राण्यांना क्रुरतेची वागणूक देऊन गोवंश जनावरांना चारा पाणी न देता निर्दयपणे बांधून ठेवित कत्तलखान्यात नेण्याच्या डाव उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली व पोलीस ठाणे साकोली यांच्या संयुक्त कारवाईने रविवारी १६ जूनच्या रात्री उधळला. यात प्राणी संरक्षण कायदा अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. प्रकरण असे की, भिवसनटोला जांभळी येथील आरोपी अजय जागेश्वर उके वय ४५ व उमेश विश्वनाथ मेश्राम दोन्ही रा. भिवसनटोला / जांभळी ता. साकोली. यांनी दि. १६ जूनला मध्यरात्री ३ दरम्यान बोलेरो माल वाहतुक गाडी क्र. एम एच २६ ए.ए १२८५ किंमत ५ लाख ५० हजार वाहनामध्ये पांढºया रंगाचे १६ गायी , पांढºया रंगाचे ७ गोरे ,काळ्या पांढºया रंगाचा १ गोरा , पांढ-या रंगाचे २ लहान गोरी, लाल रंगाचे २ गायी, लाल पांढरे रंगाचे २ गोरे , लाल रंगाचा ३ गोरे , लाल पांढºया रंगाचे १ गाय असा एकुण मिळुन ७ लाख २२ हजार रूपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
आरोपींनी वाहनातील गोवंश गायी व गोरे यांची अत्यंत क्रूरपणे नॉयलॉन दोराला बांधून त्याची वाहतुक करीत कत्तलखान्यात नेण्याचे हेतूने अवैधरित्या मिळून आल्याने पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंह,साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे, विजय कसोधन, पोलीस नायक स्वप्निल गोस्वामी, पोलीस शिपाई महेश नैताम, लोकेश कोटवार, प्यारेलाल आचले, आंबेडारे यांनी केली.