भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक मजुराला ९० दिवसाच्या काम मिळावे म्हणून शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे. परंतु मोहाडी तालुक्यातील उसर्रा ग्राम पचायत येथे अजून पर्यंत गावातील मजुरांना रोजगार हमी योजनेचे काम मिळाले नाही. उसर्रा हे गाव अडीच ते तीन हजार लोकसंख्या वस्तीची असून येथील मजुरांना रोजगार हमीची प्रतीक्षा असून आतापर्यंत रोजगार हमी योजना सुरू झालीच नाही. मोहाडी तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमीचे काम सुरू झाले आहेत. जवळपास एक ते दीड महिना झाला कामे सुरू होऊन परंतु मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथे अजून पर्यंत रोजगार हमीचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे तेथील मजुरांमधे रोष निर्माण झाला आहे. ग्राम पंचायत सदस्य सुनील पारधी यांनी सरपंच/सचिव यांच्याशी चर्चा करून रोजगार हमी योजना मंजूर असलेली कामे सुरू करून मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यावर सरपंच व सचिव यांनी सदस्यांना चर्चेतून सांगितले की, नाला सरळीकरण कामाची डिमांड पाठवून ५ जून पर्यंत काम सुरू करून मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात येईल पण आज दिनांक १३ जून पर्यंत रोजगार हमीचे कामे सुरू झाले नाही.
रोजगार हमी विभाग मोहाडीला सदस्यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की उसर्रा ग्रामपंचायत कार्यालय सरपंच व सचिव यांच्या कडून नाला सरळीकरण कामाची डिमांड आली नाही. रोजगार हमीचे कामे मार्च महिन्यापासून ते जून पर्यंत सुरू असतात परंतु उसर्रा येथील मजुरांना हातात काम नसल्यामुळे अनेक मजूर निराश झाले आहेत. आता सध्या कोणत्याही प्रकारचे काम मजुरांना मिळत नाही त्यामुळे ग्रामपंचायत व शासनाने लवकरात लवकर रोजगार हमीचे कामे सुरू करावी अशी मागणी ग्रा.पं.सदस्य सुनील पारधी यांनी केली आहे. तसेच ही मागणी मजुरांचीही असून लवकरात लवकर जर रोजगार हमीचे काम सुरू न झाल्यास गावातील मजुरां कडून आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सुद्धा दिला आहे.