भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तींना न्याय देण्यात यावा यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया गोसे (खुर्द) येथील विनोद तुळशीराम मेश्राम यांना गावातील निकेश कळमकर, लोकेश कळमकर आणि काही लोकांनी संगनमत करून विनोद मेश्राम आणि पुरंदर मेश्राम यांना जादूटोणा करणी करणारा आहे असा आरोप करून दोराने बांधून जीवानिशी मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापात केली. या घटनेची तक्रार पोलीस स्टेशन पवनी येथे करण्यात आली परंतु यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कोणतीच कारवाई न केल्यामुळे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवगडे, दशरथ शहारे, पुरुषोत्तम गायधने, डॉ.प्रवीण थुलकर डॉ.विश्वजीत थुलकर, बंडू ढेगे, संगीता हटवार अश्विनी भिवगडे, अर्जदार विनोद मेश्राम यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन सविस्तर माहिती दिली. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी तात्काळ जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम ६ नुसार गुन्ह्यात वाढ करण्याचे निर्देश दिले.