भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : पाणी पुरवठा करणा-या विहीरीत पाणबुडी मोटार काढण्यासाठी उतरलेल्या इसमाचा विहीरीत बुडुन मृत्यु झाल्याची घटना आज मंगळवार १८ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यातील निमगाव तलाव परिसरात घडली. माधो सोविंदा मेश्राम (५०) रा. बोंडगावदेवी असे मृताचे नाव आहे. माहीतीनुसार निमगाव येथे जलजिवन मिशन अंतर्गत जल कुंभ व विहीर बांधकाम प्रगतीपथावर आहे. विहिरीचे काम सुरु असताना विहिरीतील पाणी उपसा करणारी पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार विहीरीत पडली. मोटार बाहेर काढण्यासाठी माधो मेश्राम यांना बोलाविण्यात आले होते. मृतक माधो यांना विहीरीतुन साहित्य काढण्यात महारत होते. दुपारच्या सुमारास माधो विहीरीत उतरले. विहिरीमध्ये २० ते २५ फुट पाणी होते. विहीरीत उतरल्यानंतर दोन ते वेळा ते पाण्याबाहेर आले. मोटार बांधण्यासाठी दोर घेवुन गेल्यावर पुन्हा पाण्याबाहेर आलाच नाही. त्यामुळे त्याचा विहीरीतच मृत्यु झाला. घटनास्थळी अग्णीशमन दल दाखल झाले असून वृत्त लिहीपर्यंत माधो यांचे प्रेत विहिरीबाहेर काढण्यात आले नव्हते.