भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील बहुचर्चीत सुयार्टोला जळीत कांडातील आरोपी किशोर श्रीराम शेंडे (४२) रा. भिवापूर ता. तिरोडा याला जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण दाखल केले आहे. किशोरने पत्नी, चार वर्षांचा मुलगा व पक्षाघातग्रस्त सासºयावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले होते. किशोरच्या वारंवारच्या छळाला कंटाळून त्याची पत्नी आरती (३०), मुलगी स्वरागिणी (७) व मुलगा जय (४) यांना सोबत घेऊन माहेरी सुर्याटोला येथे फेब्रुुवारी २०२३ मध्ये आली होती. पत्नी माहिरी गेल्याचा राग बाळगून किशोर संतप्त झाला व त्याने तिघांच्या हत्येचा कट रचला. तो १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुचाकीने सुर्याटोला येथे पेट्रोलने भरलेली डबकी सोबत घेऊन आला. रात्र झाल्यावर त्याने सुर्याटोला स्थित सासºयाचे घर गाठले. त्यावेळी आरती, जय व सासरे देवानंद सितकू मेश्राम (५२) हे तिघेही झोपी गेले होते. दरम्यान किशोरने पेट्रोल ओतून तिघांना आग लावली. पक्षाघातग्रस्त देवानंद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आरती व जय ९० टक्के भाजले. त्यांना नागपुर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची नोंद करून किशोरला त्याच्या गावाहून अटक केली. विविध गुन्हे नोंदवून प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले.
६ मे रोजी किशोरवर दोष सिद्ध झाले. ९ मे रोजी न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी किशोरला फाशीची शिक्षा सुनावली होती. फौजदारी प्रकिह्यया संहितेमधील कलम ३६६ अनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले आहे. किशोर शेंडे नागपूर मध्यवर्ती कारागृहात असल्याचे कळते. सूर्याटोला येथे गतवर्षी फेब्रु बह्युवारी महिन्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून गेले होते. देवानंद मेश्राम, आरती व जय यांचा मृत्यू झाला होता. स्वरागिनी ही घटनेच्या दिवशी तिच्या आत्याकडे झोपायला गेली होती. आरतीची आई ममता मेश्राम या त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी झोपल्या असल्याने सुदैवाने या दोघ्याही बचावल्या.