मुंबई : अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. तर, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावर राजेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे. आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून त्यांची बदली करण्यात आली आहे. आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वादमतभेद तसंच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचं नाव प्रसारमाध्यमांमध्येही नेहमी असते.