‘त्या’ अपघातातील अज्ञात टिप्परला शोधण्यात पोलिसांना यश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनीकडून सिंदपुरीकडे भरधाव वेगात जाणाºया टिप्परने वैनगंगा नदी पुलावर एका दुचाकीस्वारास धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेतील अज्ञात टिप्परला शोधण्यात पोलिसांना यश आले असून आरोपी फरार टिप्पर चालकाचे नाव सुरज रोहनकर गंगापूर उमरेड असे आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक १२जूनला सायंकाळी ८ वाजे दरम्यान एकाच दिशेने जाणाºया दुचाकी व टिप्परमध्ये टक्कर झाली होती. यात दुचाकीस्वाराच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन करुण अंत झाला होता.

यातील मृतकाचे नाव देविदास श्रावण माथुरकर(४६) मु. पालोरा(चौ) असे असून तो पवनी येथे लग्न समारंभाला आला होता. घटना स्थळावरून टिप्पर पसार झाल्याने पोलिसांनी अज्ञात टिप्पर चालकांवर गुन्हा नोंद केला होता. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पवनी पोलिसांनी तपासाची सूत्रे चालवून गंगापूर उमरेड येथील टिप्परला पकडण्यात यश संपादन केले. सदरची कारवाई घटनेच्या वेळेपासून अवघ्या २४ तासात केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेची झलक पाहायला मिळाली. यातील टिप्परला पोलिसांनीदिनांक १४ जुनला डिटेन केले असून आरोपी टिप्पर चालकावर भांदवीच्या कलम २७९, ३०४(अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांचे मार्गदर्शनात पीएसआय जितेंद्र तिजारे, शैलेश मोहरकर, किशोर बुरडे, संभाजी हाके यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *