भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पडलेल्या खड्डयासंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदन देवूनही सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे राजीव गांधी चौकात रास्तारोका आंदोलन करण्यात आले. शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत जिल्हाधिकारी, नगर परिषद कार्यालय, सार्वजनक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला अनेकदा निवेदने देण्यात आले होते. परंतु ढिम्म प्रशासनाच्या उदासिनतेमुळे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हजारो नागरिकांना दररोज रस्त्यांवरील खड्डयांमुळे प्रचंड मन:स्ताप सहन कर- ावा लागत आहे.
याशिवाय शहरातील सुरू असलेल्या अनेक विकास कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असतांना नगर परिषदेचे अधिकारी कोणतीही कारवाई न करता तक्रार करणाºयांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे याविरोधात भंडारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वात आज १८ जून रोजी दुपारी राजीव गांधी चौक येथे रास्ता रोको आंदोलन आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख आशिक चुटे, नरेंद्र पहाडे, राकेश आग्रे, मनिष सोनकुसरे, तिलक सार्वे, विनोद डाहारे, हर्षल टेंभूरकर, चित्रागंध सेलोकर, संदिप गभने, गंगाधर निंबार्ते, नितीन कळंबे, अश्विन खरोले, जयेश रामटेके, गुरूदेव साकुरे, गोपीचंद गोमासे, सूरज मालाकार, शूभम बहादुरे, अरविंद भुरे, अमित चकोले, शेखर वाघमारे, नितीन भुरे, सुनील नागपुरे, रोशन मेश्राम, प्रकाश गभने, संजय समरीत, कोमल जावळकर, इमरान शेख, बाळू परतेती, निखील साकुरे, दत्ता लोहकरे आदी उपस्थित होते.