भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील मुख्य रस्ता समजला जाणारा प्रमुख रस्ता म्हणून मुस्लीम लायब्ररी चौक ते त्रिमुर्ती चौक हा रस्ता असून सदर रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून अनेक खड्डे पडल्या नंतर देखील माजी खासदार व आमदार यांनी खड्डयाकडे लक्ष न देता फक्त आपल्या राजकीय कामात व्यस्त असल्याने या रस्त्याला राजकीय फटका बसल्याने सदर रस्त्याची साधी डागडुजी सुद्धा करण्यात आली नव्हती. यामुळे वर्षभरात या रस्त्यावर अनेक छोटे मोटे अपघाताचे सत्र दैनंदिन सुरु होते. यात अनेक युवक व वृध्द जखमी झाले आहेत. मात्र अनेक नागरीक जखमी झाले असले तरी देखील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा हे साधी या खड्डयाची दखल घेत नसल्यामुळे या खड्डयाकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी मुस्लिम लायब्ररी चौकासमोरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांत दिनांक १४ मे २०२४ रोजी रस्त्यावर चक्क रांगोळी काढत खड्डयातच बसून गांधीगिरी आंदोलनाने एल्गार पुकारुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.
याच गांधीगिरी आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत लोकसभा निवडणूकीकरीता लागलेली आचार संहिता संपताच रस्त्याच्या कामाला लागले असल्याने अनेक वर्षापासून खड्डेमय झालेला हा प्रमुख रस्ता आता गुळगूळीत झाले आहे. डांबरीकरणाने गुळगुळीत झालेला रस्ता पाहून सामान्य नागरीकांनी अजय मेश्राम यांच्या खड्डयात बसुन केलेल्या आंदोलनाची दखल घेतली याचे समाधान व्यक्त करीता भेट देत त्यांना शहरातील अनेक समस्याकडे लक्ष केंद्रीत करण्याकरीता देखील सामान्य नागरीकांनी विनवनी केली आहे. पावसाळयात मुस्लिम लायब्ररी चौकासमोरील खड्डयांपासून एका आंदोलनामुळे मुक्तीमिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांचे व प्रशानाने या आंदोलनाची दखल घेतल्याने प्रशासनाचे देखील नागरीकांनी आभार मानले आहे.