भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासनाकडून वयोवृध्द, निराधार, विधवा, अपंग, बीपीएल यांच्याकरीता विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरीता परिसरात अनेक दलाल सक्रीय झाले असून लाभ्यार्थ्यांकडून पैसा उकळत असल्याची बाब समोर आली आहे. केंद्र व राज्य शासनाकडुन अनेक योजना राबविण्यात येतात. यात श्रावणबाळ योजना, निराधार, विधवा, अपंग यांच्याकरीता अनेक योजना व आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत मासीक मदत दिली जाते. या योजनेच्या लाभा करीता तलाठी कार्यालय अतंर्गत अर्ज करावे लागतात.
यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. अनेक लाभार्थी अशिक्षित असल्यामुळे त्यांना या योजनेची परिपूर्ण माहिती नसते. दलाल त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांचे काम करून देतो म्हणून हजार ते दोन हजार रूपयांची वसूली करताना दिसत आहेत. याकडे भंडाराचे तहसिलदार तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालून अशा दलालांचा बंदोबस्त लावण्याची मागणी होत आहे.