भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सोयी-सुविधेच्या बाबतीत येथील जिल्हा क्रीडा संकूल नेहमीच चर्चेत राहते. क्रीडा संकूलाच्या दुरवस्थेवर अनेकदा खेळाडू व क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. क्रीडा योजनांसाठी लाखोचा निधी येत असताना येथे सोयी, सुविधा, खेळ साहित्य, मैदानाची वानवा पहायला मिळते. जिल्हा क्रीडा संकुलात येणारे खेळाडू व नागरिकांना पुरेशा क्रीडा सुविधा असणे आवश्यक आहेत. त्या उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी बैठकीत संबंधित अधिकाºयांची कानउघडणी करून सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यास बजावले. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेत आज २० जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश लभाने, उपमुह्यय कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बह्याळ, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे उपस्थित होते. बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्तास व जिल्हा क्रीडा संकुल येथील जमा खर्चास समितीने मान्यता दिली. सोबतच विविध विषयांवर चर्चा झाली.
क्रीडा संकुलाचे उत्पन्न स्रोत कमी असून त्या तुलनेत खर्च अधिक असल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी म्हणाले की, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात यावा, जेणेकरून खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे सोईचे होईल. कह्यीडा संकुल परिसरात येणारे खेळाडू व नागरिक यांच्यासाठी संकुल परिसरातच कॅफेटेरिया असावा अशी संकल्पना पुढे आली असता संकुल परिसरात असलेल्या दोन वसतिगृहाच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत कॅफेटेरिया व कॅन्टीन तयार करण्यास समितीने सहमती दर्शविली. संकुलात असलेल्या मुलींच्या वसतिगृह इमारतीत असलेल्या हॉलची दुरुस्ती करण्यावरही यावेळी चर्चा झाली. क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची दुरुस्तीची गरज असल्याचे खुरपुडे यांनी समितीच्या निदर्शनास आणले. निधीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्य कह्यमाने दुरुस्ती करण्यावर समितीचे एकमत झाले. क्रीडा संकुलात असलेल्या पॉलिगह्यास फुटबॉल मैदानाचे बांधकाम सप्टेंबरपूर्वी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले. क्रीडांगण अनुदान योजनेतून संकुलात प्रसाधनगृह तयार करण्यास समितीने मान्यता दिली.